शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्ठा दिलासा! कॅन्सर, शुगरसह अनेक गंभीर आजारांवरील औषधे झाली स्वस्त, असे आहेत नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:52 IST

Medicines Price: केंद्र सरकारने कॅन्सर, डायबिटिस, ताप आणि हेपेटायटिससह अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटवले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कॅन्सर, डायबिटिस, ताप आणि हेपेटायटिससह अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटवले आहेत. केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश असलेल्या ११९ औषधांचे कमाल दर निश्चित केल्याने या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता येत्या काळात आणखी काही औषधांचा समावेश हा एनएलईएममध्ये करून त्यांच्या कमाल किमती निश्चित करण्याचा केंद्राचा विचार आहे. दरम्यान, ताप आल्यावर दिल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलचे दरही १२ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीच्या बैठकीमध्ये या यादीत समावेश असलेल्या  ११९ प्रकारच्या फॉर्म्युलेशनवाल्या औषधांची कमाल किंमत प्रति टॅबलेट आणि कॅप्सुलबाबत निश्चित करण्यात आली आहे. ज्या मुख्य औषधांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये तापावरील औषध पॅरासिटामॉल आणि मलेरियामधील औषधांमध्ये उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन यांचा समावेश आहे.

औषधांची जुनी किंमत आणि नवे दर पुढीलप्रमाणे टेमोझोलोमाइड - आताची किंमत ६६२.२४ रुपये, नवी किंमत ३९३.६एलोप्युरिनॉल - आताची किंमत ८.१ रुपये, नवी किंमत ५.०२ रुपयेसोफोसबुवीर - आताची किंमत ७४१.१२ रुपये, नवी किंमत ४६८.३२ रुपये  लेट्रोझोल - आताची किंमत ३९.०३, नवी किंमत २६.१५ रुपये क्लेरिथोरोमाइसिन - आताची किंमत ५४.८ रुपये, नवी किंमत ३४.६१ रुपये हेपरिन - आताची किंमत २४.३९ रुपये, नवी किंमत १८.९२ रुपयेफ्लुकोनाझोल - आताची किंमत ३४.६९ रुपये, नवी किंमत २६.५३ रुपयेमेटफोर्मिन - आताची किंमत ४ रुपये, नवी किंमत ३.११ रुपयेसोफिक्सिम - आताची किंमत २४.५ रुपये, नवी किंमत १९.७१ रुपयेपॅरासिटामोल - आताची किंमत २.०४ रुपये, नवी किंमत १.७८ रुपयेहायड्रोक्सिक्लोरोक्विन - आताची किंमत १३.२६ रुपये, नवी किंमत १२.३१ 

टॅग्स :medicinesऔषधंHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार