शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी ऐक्याला मोठा धक्का, भाजपाविरोधातील राष्ट्रव्यापी आघाडीत सहभागी होण्यास शिवसेनेच्या मित्रपक्षाने दिला नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:14 IST

K Chandrashekar Rao News: तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हैदराबाद - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एक राष्ट्रव्यापी आघाडी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. मात्र तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राव यांनी बुधवारी सांगितले की, ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गैर-काँग्रेस आणि गैर-भाजपा पक्षांची राजकीय आघाडी तयार करण्याच्या बाजूने नाही आहेत. सध्या देशाला अशा आघाडीऐवजी टीआरएसप्रमाणे एका पर्यायी अजेंड्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

पक्षाच्या २१व्या स्थापना दिवशी झालेल्या बैठकीला संबोधित करताना के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, डाव्या पक्षांनी हल्लीच माझी भेट घेऊन केंद्रातून भाजपाला हटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, सांगितले की, पंतप्रधानांना हटवण्याचा विषय चुकीचा होता. शेवटी लोकशाहीचा विजय झाला पाहिजे.

उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रशेखर राव यांनी केलेलं हे विधान त्यांच्या भाजपाविरोधातील आधीच्या विधानांपेक्षा एकदम विरुद्ध आहे. त्यांनी ११ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यात मोदींना उद्देशून म्हटले होते की, त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा जनता त्यांचे सरकार पाडेल. मात्र बुधवारच्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की, टीआरएस एक प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे टीआरएसला राष्ट्रीय पक्षामध्ये बदलण्याचाही सल्ला आला होता. तसेच टीआरएसचं नाव बदलून भारतीय राष्ट्र समिती करण्याचाही सल्ला मिळाला होता.

दरम्यान, केसीआर यांनी सांगितले की, जर हैदराबादमधून देशाची दिशी बदलणार असेल तर ती तेलंगाणाच्या जनतेसाठी अभिमानाची बाब असेल. टीआरएस पर्यायी अजेंडा तयार करण्यासाठी आणि देशाला नवी दिशा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, पर्यायी शक्ती लवकरच समोर येईल आणि एक राजकीय वादळ निर्माण करील, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाPoliticsराजकारण