शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबाच्या कबरीभाेवती १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण; भिंतीवर काटेरी ताराही, नुकसान टाळण्यासाठी केंद्राकडून खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:20 IST

Aurangzeb's tomb; मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खबरदारीचे उपाय करीत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली. 

 नवी दिल्ली -  महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खबरदारीचे उपाय करीत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात शेखावत यांनी औरंगजेबाची कबर एएसआयचे एक संरक्षित स्मारक असल्याचे सांगून याचा तपशील एएसआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे नमूद केले. 

काय होता प्रश्न?औरंगजेबाची कबर एएसआयच्या कक्षेतील संरक्षित स्मारक आहे का आणि असेल तर या तपशिलाचा उल्लेख एएसआयच्या वेबसाइटवर केला आहे का?. कबरीचे नुकसान होण्याचा धोका आहे हे एएसआयला ज्ञात आहे का आणि असेल तर याच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली आहेत,  अशी विचारणाही करण्यात आली होती. 

अशा असतील उपाययोजनाया संरक्षित स्मारकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून एएसआय सातत्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पावले उचलत आहे. यात मकबऱ्याच्या चारही बाजूला १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण लावणे, अतिक्रमण करणाऱ्यांना अटकाव व्हावा म्हणून कबरीच्या शेजारील भिंतींवर काटेरी तारा लावणे.मल्टि टास्किंग स्टाफसोबतच खासगी सुरक्षा रक्षक तैनात करून याची एएसआय अधिकाऱ्यांमार्फत नियमित निगराणी करणे यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर