शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

August Kranti Diwas: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्टला घडली होती 'क्रांती'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 09:37 IST

संपूर्ण देश पेटून उठल्यानं ब्रिटिशांचे धाबे दणाणले होते

मुंबई: ऑगस्ट क्रांती दिनाला आज 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो'ची गर्जना केली. यानंतर देशभरात इंग्रजांविरोधात आंदोलनं सुरू झाली. ब्रिटिशांना हाकलण्यासाठी देशातील जनता पेटून उठली. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्यानं ब्रिटिशांची धाबे दणाणले. देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री मिळाल्यानं पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आलं. 'आता प्रत्येकजण पुढारी होईल,' असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आलं. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आलं आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. मात्र ब्रिटिश सरकारनं गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरली. गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली. नेत्यांची धरपकड झाल्यानं शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती. मात्र घडलं भलतंच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभर जागोजागी आंदोलनं, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारनं जमावबंदी लागू केली. पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. देशातील जनतेनं ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती. पाहिजे त्याला करून विनाचौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता.सरकारनं या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवलं. गांधीजींना याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ 21 दिवसांचं उपोषण केलं. पण याचवेळी जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडं दोस्त राष्ट्रांच्या बाजूनं झुकत होतं. अमेरिका नावाची महासत्ता उदयास येत होती. अमेरिकेच्या मदतीनं ब्रिटिशांनी मुसंडी मारली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. महायुद्धाच्या आघाडीवर दिलासा मिळाल्यानं ब्रिटिशांनी सर्व यंत्रणा भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरली आणि क्रांतीची तीव्रता हळूहळू कमी झाली.  

टॅग्स :Indiaभारत