अबब! देशातील ९८ अब्जाधीशांकडे ५५ काेटी गरिबांएवढी संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:14 AM2022-01-18T06:14:52+5:302022-01-18T06:16:01+5:30

देशातील ५५.२ काेटी लाेकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती केवळ ९८ अतिश्रीमंतांकडे गाेळा झाल्याचे या अहवालातून उघडकीस आले आहे. 

98 billionaires in india have as much wealth as 55 million poor people | अबब! देशातील ९८ अब्जाधीशांकडे ५५ काेटी गरिबांएवढी संपत्ती

अबब! देशातील ९८ अब्जाधीशांकडे ५५ काेटी गरिबांएवढी संपत्ती

Next

- अभिलाष खांडेकर

नवी दिल्ली : देशातील गरिबी कमी हाेत असल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांचे नेते सातत्याने करतात. मात्र, त्यांच्या डाेळ्यात झणझणीत अंजन घालणारा अहवाल ऑक्सफॅम इंडियाने सादर केला आहे. देशातील ५५.२ काेटी लाेकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती केवळ ९८ अतिश्रीमंतांकडे गाेळा झाल्याचे या अहवालातून उघडकीस आले आहे. 

ऑक्सफॅमने ‘इनसाईड इंडियाज इनइक्वालिटी क्रायसिस- अ कन्ट्री ऑफ बिलियनिअर्स’ हा अहवाल तयार केला असून वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरमच्या पूर्वी ताे सादर केला. त्यातून अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काेराेना महामारी गरिबांच्या जिवांवर उठली असताना श्रीमंत अब्जाधीशांसाठी महामारी वरदान ठरली आहे. श्रीमंतांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे, तसेच अब्जाधीशांची संख्याही १०२ वरून १४२ वर गेली आहे.  त्यातील ९८ अब्जाधीशांकडे तब्बल ४९.२७ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील ५५.२ काेटी गरिबांकडे मिळून एवढी संपत्ती आहे. काेराेनाकाळात देशातील ४.६ काेटी नागरिक गरीब झाले आहेत.

केचळ १० टक्के लाेकांकडे ४५ टक्के पैसा
देशातील ४५ टक्के पैसा केवळ १० टक्के लाेकांकडे आहे. ९८ अब्जाधीशांची संपत्ती भारत सरकारच्या एकूण बजेटच्या जवळपास ४१ टक्के आहे. टाॅप १० श्रीमंतांनी दरराेज ७.४ काेटी रुपये खर्च केले, तरीही त्यांची संपत्ती पूर्णपणे खर्च हाेण्यासाठी ८४ वर्षे लागतील.

Web Title: 98 billionaires in india have as much wealth as 55 million poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.