शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिल्ली मेट्रोतील पाकीटमारांमध्ये ९३ टक्के महिला, सीआयएसएफच्या कारवाईतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:42 IST

नवी दिल्ली : राजधानीतील मेट्रो स्टेशन्सवर गेल्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पकडलेल्या पाकीटमारांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या. पाकिटे चोरल्याबद्दल ज्या १,३११ लोकांना पकडण्यात आले, त्यात १,२२२ (९३.३ टक्के) महिला होत्या.सीआयएसएफने पाकीटचोरांना पकडण्यासाठी पथके तयार केली असली तरी पाकीटमारीत खंड पडलेला नाही. याचे कारण म्हणजे सीआयएसएफला गुन्हे दाखल ...

नवी दिल्ली : राजधानीतील मेट्रो स्टेशन्सवर गेल्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पकडलेल्या पाकीटमारांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या. पाकिटे चोरल्याबद्दल ज्या १,३११ लोकांना पकडण्यात आले, त्यात १,२२२ (९३.३ टक्के) महिला होत्या.सीआयएसएफने पाकीटचोरांना पकडण्यासाठी पथके तयार केली असली तरी पाकीटमारीत खंड पडलेला नाही. याचे कारण म्हणजे सीआयएसएफला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार नाहीत. आम्ही या चोरांना पोलिसांच्या हवाली करतो. पाकीट गमावलेल्या व्यक्तीने गुन्हा नोंदवला नाही, तर त्या चोराला सोडण्यात येते. मग हेच चोर काही दिवसांनी वेगवेगळ्या मेट्रो स्टेशन्सवर जातात. त्यामुळे एकाच टोळीला अनेक वेळा पकडण्यात आले आहे.हे पाकीटचोर ज्या स्टेशन्सवर खूपच गर्दी असते अशा ठिकाणी सक्रिय असतात. अशा ठिकाणांत राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, चांदणी चौक, चावडी बाजार, नवी दिल्ली आदींचा समावेश आहे.पाकीटचोर महिला गटागटांत काम करतात. प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी सोबत लहान मुले बाळगतात.एक पाकीटचोर प्रवाशाला लक्ष्य करतो त्या वेळी त्याचे इतर सोबती त्याच्या भोवती गोळा होतात किंवा इतर प्रवाशांना तो दिसणार नाही अशा पद्धतीने तेथेच उभे राहतात. या चोरांकडे सापडलेल्या सामग्रीमध्ये लॅपटॉप्स, फोन्स, दागिने, पैशांची पाकिटे, पर्सेस आणि वस्तू होत्या.महिला, मुलांना मदतदिल्ली मेट्रो व त्याच्या संकुलांच्या सुरक्षेचे काम सीआयएसएफकडे आहे. सीआयएसएफची पथके प्रवाशांसोबत प्रवास करतात. २०१७ मध्ये १९४१ पुरुष महिलांच्या डब्यात गेल्याबद्दल सीआयएसएफने खाली उतरवले. मेट्रो स्टेशन्सवर अडचणीत सापडलेल्या महिलांना २४८ प्रकरणांत सीआयएसएफने मदत केली व हरवलेली १५३ मुले त्यांच्या पालकांना सुपुर्द केली.1311 एकूण पाकीटमार1222महिला93.3% महिला पाकीटमार

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्लीThiefचोर