शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:06 IST

Abortions: गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत.

बंगळुरू - गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत. म्हैसूर शहरातील रुग्णालयात हे स्त्रीभ्रूणहत्या रॅकेट सुरू होते.गेल्या महिन्यात मंड्यातील  शिवलिंगे गौडा, नयन कुमार यांना अटक करण्यात आली. तेव्हा हे दोघे गर्भवतीस कारमध्ये गर्भपातासाठी घेऊन जात होते. चौकशीनंतर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. मुलगी नको असलेली दाम्पत्ये त्यांच्याकडे येत. अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये गर्भ मुलीचा असल्याचे आढळल्यास गर्भपात केला जाई. 

३०,००० रुपये आरोपी प्रत्येक बेकायदा गर्भपातासाठी आकारत.

सहा जणांना अटक- डॉ. बल्लाळ आणि निसार यांच्या अटकेने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे. या दोघांना गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आले होते. - रुग्णालयाच्या व्यवस्थापक मीना व रिसेप्शनिस्ट रिझमा खान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक झाली.

गूळ युनिटमध्ये होत होती लिंगनिश्चितीया दोघांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. लिंगनिश्चिती व स्त्रीभ्रूणहत्येसाठी चक्क एका गूळ युनिटचा अल्ट्रासाऊंड स्कॅन सेंटर म्हणून वापर केला जात होता.चौकशीत ही बाब समोर येताच पोलिसांनी गूळ युनिटवर छापा टाकून स्कॅन मशीन जप्त केले. गेल्या तीन वर्षांत आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांनी म्हैसूर रुग्णालयात सुमारे ९०० बेकायदा  गर्भपात केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

 

 

 

 

 

 

टॅग्स :Abortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारीdocterडॉक्टरArrestअटक