शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

२५ वर्षे जपलेला पिंपळ तोडल्याने ९० वर्षीय वृद्धेचा हंबरडा, केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:50 IST

देवला बाई पटेल यांनी लावलेले व जोपासलेले झाड तोडले गेले असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाची अवस्था पाहून झाडाच्या बुंध्यावर डोके टेकवून रडू लागल्या. 

खैरागड (छत्तीसगड) : तब्बल २५ वर्षांपूर्वी लावलेले पिंपळाचे झाड बेकायदा तोडण्यात आल्याने एका ९० वर्षीय महिलेने दुःखाने हंबरडा फोडला. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना खैरागड-चुईखादन-गंडाई जिल्ह्यातील सरगोंडी गावाच्या बाहेरील रस्त्यालगत घडली आहे. ५ ऑक्टोबरच्या रात्री हे झाड तोडण्यात आले होते.

देवला बाई पटेल यांनी लावलेले व जोपासलेले झाड तोडले गेले असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाची अवस्था पाहून झाडाच्या बुंध्यावर डोके टेकवून रडू लागल्या. 

रिजिजू यांनी घेतली दखलत्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही तो ‘एक पेड़ माँ के नाम’ या हॅशटॅगसह शेअर करत “मन हेलावून टाकणारा प्रसंग” अशी प्रतिक्रिया दिली.

दोघांना अटक गावकरी प्रमोद पटेल यांच्या तक्रारीवरून इम्रान मेमन आणि प्रकाश कोसरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. झाडाभोवती दोन लहान देऊळ बांधण्यात आले होते.या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ (धार्मिक स्थळाचे अपमान करण्याचा प्रयत्न) आणि २३८ (गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न) तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीपासून संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.  

रात्रीत तोडले झाडमेमनने नुकतेच झाडालगतची शेतजमीन खरेदी केली होती. रस्त्यावर थेट जाता यावे म्हणून झाड तोडण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे पोलिसांनी सांगितले. गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही आरोपींनी रात्रीच्या वेळी झाड कापले. त्यांनी वापरलेली कटर मशीन नदीत फेकून दिली, ती शोधण्यासाठी पाणबुड्यांना बोलावण्यात आले आहे. गावकऱ्यांनी झाड तोडलेल्या ठिकाणी धार्मिक विधी करून देवाची क्षमा मागितली आणि देवला बाईंच्या हस्ते नवीन पिंपळाचे रोप लावले.

English
हिंदी सारांश
Web Title : 90-year-old weeps as tree she nurtured for 25 years felled.

Web Summary : Chhattisgarh: A 90-year-old woman cried after her 25-year-old banyan tree was illegally cut. Police arrested two. Minister Rijiju reacted, sharing the video. The accused are booked for hurting religious sentiments and destroying evidence. Villagers planted a new tree.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड