नवी दिली : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका नरेंद्र मोदी सरकारवर गुरुवारी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही, अशा शब्दांत त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर निशाणा साधला. दरम्यान, याआधी पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, पद्मावती चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला होता.गुरुवारी एका कार्यक्रानंतर पत्रकारांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के लोकांना देशातील जनता ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के लोकांबद्दल जनतेला आदर वाटत नाही. मोदींचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या कामाबद्दल जनतेला कोणतीही माहिती नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के चेहरे जनतेसाठी अनोळखी आहेत. तर बाकीच्या 10 टक्के मंत्र्यांनी जनतेच्या मनात असलेला आदर गमावलेला आहे, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या 90 टक्के मंत्र्यांना देशातील जनता ओळखत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 22:39 IST
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका नरेंद्र मोदी सरकारवर गुरुवारी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही, अशा शब्दांत त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदींच्या 90 टक्के मंत्र्यांना देशातील जनता ओळखत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा हल्लाबोल
ठळक मुद्देमंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाहीनरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर टीकेची झोड