काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:35 AM2020-06-09T05:35:32+5:302020-06-09T05:36:08+5:30

हिज्बुल मुजाहिद्दिनच्या चौघांना टिपले : २४ तासांतील दुसरी धाडसी कारवाई

9 militants killed in Kashmir | काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचे चार अतिरेकी ठार झाले. रविवारी रेबन गावातील चकमकीत ठार झालेले पाच जमेस धरले, तर जिल्ह्यात दोन दिवसांत एकूण नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्कर, सीआरपीएफ व राज्य पोलिसांनी पिंजोरा गावात रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू केलेली कारवाई सोमवारी दुपारपर्यंत सुरू होती. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले असून, त्यांना इस्पितळात दाखल केले गेले आहे. जुलै २०१६ मध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहाण वणी मारला गेल्यापासून शोपियान जिल्हा हे दशतवाद्यांचे मुख्य केंद्र बनल्याचे दिसत आहे. रविवारच्या रेबन येथील चकमकीत ठार झालेल्यांमध्ये हिज्बुलचा कमांडर फारुख असद नल्ली याचाही समावेश होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गेल्या २४ मार्चला ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींत काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)

अतिरेक्यांनी केली सरपंचाची हत्या
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपोराचे सरपंच अजय पंडित यांची अतिरेक्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच गावात गोळ्या घालून हत्या केली. अजय पंडित हे काँग्रेस पक्षाचे सदस्यही होते.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या प्रवक्त्याने या हत्येचा निषेध केला व पंडित हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, असे म्हटले. या हत्येची अजून कोणत्याही अतिरेकी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.


जम्मू : यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये ८८ अतिरेक्यांना (त्यात काही टॉप कमांडर्सही होते) ठार मारण्यात आले असून इतर २८० जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सोमवारी येथे दिली.
सीमेपलीकडून काश्मीर खोºयात अनेक अतिरेकी घुसवून हिंसाचार वाढवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे सिंग म्हणाले.

नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही दोन प्रकारचे धोरण राबवत आहोत. याशिवाय अतिरेक्यांच्या संघटनांत स्थानिक युवकांनी जाऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहोत. यात आम्हाला बरेच यश आले आहे, असे सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले.
24 तासांत हिज्बुल मुजाहिदीनच्या ९ अतिरेक्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ठार मारण्यात आल्याचा संदर्भ देऊन सिंग म्हणाले की, सुरक्षादलांचा प्रयत्न हा खोºयातून दहशतवाद नियंत्रणात आणून पुसून टाकण्याचा आहे.
02 आठवड्यांत नऊ मुख्य मोहिमांमध्ये सहा टॉप कमांडर्ससह मारल्या गेलेल्या २२ अतिरेक्यांंनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती.

Web Title: 9 militants killed in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.