जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ जवान जखमी
By Admin | Updated: August 24, 2016 19:23 IST2016-08-24T18:50:03+5:302016-08-24T19:23:53+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका उपअधिक्षकांसह नऊ सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ जवान जखमी
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २४ - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका उपअधिक्षकांसह नऊ सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.
पुलवामापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डिग्री कॉलेजवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला आणि गोळीबार केला. या हल्ल्यात कॉलेज परिसरात तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. यात एका उपअधिक्षकाचाही समावेश आहे.
दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत कॉलेज परिसर खाली केला आहे.