शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

उंदरानं कुरतडल्यानं 9 दिवसांच्या बाळाचा मृत्यू, हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 9:04 AM

उंदरानं कुरतडल्याच्या कारणामुळे एका नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे बाळ केवळ नऊ दिवसांचंच होतं.

पाटणा : उंदरानं कुरतडल्याच्या कारणामुळे एका नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे बाळ केवळ नऊ दिवसांचंच होतं. बिहारमधील दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील (डीएमसीएच) हा संतापजनक प्रकार आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून मात्र हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   

मिळालेल्या माहितीनुसार, बाळ गंभीर स्वरुपात आजारी असल्याच्या कारणामुळे त्याला डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या या 9 दिवसांच्या बाळाला उंदरानं कुरतडलं आणि यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळाच्या वडिलांनी सांगितले की, उशिरा रात्री 1 वाजेपर्यंत बाळाची प्रकृती पूर्णतः ठीक होती. मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याला पाहण्यासाठी गेलो असता, त्याचे हात आणि पाय उंदरानं कुरतडल्याचं दिसले आणि बाळ मृतावस्थेत होतं. नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, डॉ. ओमप्रकाश यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. बाळाची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

याप्रकरणी पीडित कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. दरभंगाचे प्रभारी जिल्हाधिकारी कारी प्रसाद यांच्याकडे तक्रारीचा अर्ज सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी समिती गठित करुन कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन पीडित कुटुंबीयांना देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Biharबिहारnew born babyनवजात अर्भक