९ कोटींचा रेडा

By Admin | Updated: July 12, 2017 00:29 IST2017-07-12T00:29:45+5:302017-07-12T00:29:45+5:30

हरियाणातील या धिप्पाड रेड्याची सद्या बरीच चर्चा आहे.

9 crores of rupees | ९ कोटींचा रेडा

९ कोटींचा रेडा


हरियाणातील या धिप्पाड रेड्याची सद्या बरीच चर्चा आहे. कुरुक्षेत्रमध्ये राहणारे कर्मवीर सिंह यांच्या मालकीच्या या रेड्यावर अनेकांनी बोली लावली असून, ही बोली ९ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.या रेड्याचे वजन आहे १५०० किलो. बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये एका पशू मेळ्यात हा रेडा आला, तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्यावरच होते.
आपल्या मालकाला तो दरवर्षी ८० लाख रुपये कमाई करून देतो. दिल्ली आणि हरियाणातील व्यापाऱ्यांनी ९ कोटी रुपयांना हा रेडा मागितला आहे, पण कर्मवीर
सिंह त्याला विकू इछित नाहीत. अगदी विदेशातूनही लोक हा रेडा पाहण्यासाठी येतात.त्याला रोज २० लीटर दूध, फळे आणि भाज्या लागतात. दोन व्यक्ती त्याची देखभाल करतात.या रेड्याला दररोज पाच किमी फिरण्यासाठी घेऊन जातात.

Web Title: 9 crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.