०९... गुन्हे... तंबाखू

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:25+5:302015-02-10T00:56:25+5:30

(फोटो)

9 ... crime ... tobacco | ०९... गुन्हे... तंबाखू

०९... गुन्हे... तंबाखू

(फ
ोटो)
अडीच लाखांचा ऐवज जप्त
आरोपीस अटक : सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक
पारशिवनी : महाराष्ट्रात सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असताना त्या तंबाखूची परप्रांतातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक केली जाते. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके यांच्या नेतृत्वातील पथकाने केलेल्या कारवाईमध्ये सुगंधित तंबाखूसह एकूण २ लाख ४५ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी - खापरखेडा मार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गणेश रेवाजी ठाकरे (३२, रा. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पारशिवनी-खापरखेडा मार्गावरून सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी साळुंके यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे त्यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४०/एसी-०२२६ क्रमांकाच्या वाहनात सुगंधित तंबाखू असल्याचे आढळून येताच गणेश ठाकरे यास ताब्यात घेत वाहनासह तंबाखू जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये ४५ हजार ६५० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि दोन लाख रुपयांचे वाहन असा एकूण २ लाख ४५ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक अमित काळे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी साळुके,परीविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, नवनाथ ढवळे, उमेश ठाकरे, सतीश नागपुरे, नितेश रोकडे आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 9 ... crime ... tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.