०९.... गुन्हे... जोड

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:07+5:302015-02-10T00:56:07+5:30

क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

9 ... crime ... attachment | ०९.... गुन्हे... जोड

०९.... गुन्हे... जोड

षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण
खापा : क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभूरडोह येथे रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली.
दीपक यादव लोणकर (२९, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, हेमंत देवा लोणकर (२४, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हेमंतने बैलाच्या कारणावरून दीपकसोबत वाद उकरून काढला. सदर वाद विकोपास गेल्याने त्याने काठीने दीपकला मारहण केली. त्यात दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
एमआयडीसी परिसरात मोटारपंपची चोरी
पारशिवनी : स्थानिक एमआयडीसीच्या परिसरातील कंपनीच्या आवारातून मोटरपंप चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
स्थानिक एमआयडीसीमध्ये तिवारी सिमेंट प्रॉडक्ट नामक कंपनी आहे. चोरट्यांनी या कंपनीची सुरक्षा भिंत फोडून आत प्रवेश केला आणि मोटरपंप लंपास केला. या मोटरपंपची किंमत पाच हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 9 ... crime ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.