स्वाईन फ्लूचे ९६५ बळी
By Admin | Updated: February 28, 2015 00:59 IST2015-02-28T00:59:02+5:302015-02-28T00:59:02+5:30
यंदा आतापर्यंत स्वाईन फ्लूने ९६५ जणांचा बळी घेतल्याचे शुक्रवारी सरकारने लोकसभेत सांगितले़ स्वाईन फ्लूची चाचणी करणा-या प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याची कबुलीही दिली़

स्वाईन फ्लूचे ९६५ बळी
नवी दिल्ली : यंदा आतापर्यंत स्वाईन फ्लूने ९६५ जणांचा बळी घेतल्याचे शुक्रवारी सरकारने लोकसभेत सांगितले़ स्वाईन फ्लूची चाचणी करणा-या प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याची कबुलीही दिली़
आरोग्यमंत्री जे़पी़ नड्डा यांनी स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रकोपावर गंभीर चिंता व्यक्त केली़ सध्या स्वाईन फ्लूची चाचणी करणाऱ्या २१ प्रयोगशाळा देशात आहेत़ ही संख्या निश्चितपणे पुरेशी नाही़ येत्या काळात प्रत्येक राज्यात एच १ एन १ विषाणूंची चाचणी होऊ शकेल अशी एक अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत़ यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे़