९६ कोटींची रोकड जप्त

By Admin | Updated: January 30, 2017 00:59 IST2017-01-30T00:58:15+5:302017-01-30T00:59:08+5:30

विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांतून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या टेहळणी आणि खर्च निरीक्षक पथकाने ९६ कोटी रुपयांची रोकड

9 6 crore cash seized | ९६ कोटींची रोकड जप्त

९६ कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांतून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या टेहळणी आणि खर्च निरीक्षक पथकाने ९६ कोटी रुपयांची रोकड, २५ कोटी २२ लाख रुपयांची दारू आणि १९ कोटी ८३ लाख रुपये किमतीचे ४,७०० किलो अमलीपदार्थ जप्त केले. सर्वाधिक जप्ती उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून करण्यात आली आहे.
निवडणुकांची घोषणा झाल्यापासून काल शनिवारपर्यंत उत्तर प्रदेशातून ८७ कोटी ६७ लाख रुपये, पंजाबमधून ६ कोटी ६० लाख रुपये, गोव्यातून १ कोटी २७ लाख रुपये, उत्तराखंडमधून ४७ लाख आणि मणिपूरमधून ८ लाख १३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यास अवैध मार्गाने दारू आणि अमली पदार्थांचे आमिष दाखविण्यात आल्याचा संशय असून, या पाच राज्यांतून २५ कोटी २२ लाख रुपये किमतीची दारू (१४ लाख २७ हजार लिटर) जप्त केली आहे.

Web Title: 9 6 crore cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.