शस्त्राच्या धाकावर ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:51+5:302015-01-30T21:11:51+5:30

शस्त्राच्या धाकावर ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

9 5 thousand people have died due to the weapon | शस्त्राच्या धाकावर ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

शस्त्राच्या धाकावर ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

्त्राच्या धाकावर ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास
नागपूर : आपल्या घरात झोपलेल्या व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश परसराम चंद्रिकापुरे (५८) रा. आर्या मेडिकल मागे, गीतानगर, झिंगाबाई टाकळी हे आपल्या पत्नीसह बेडरुममध्ये झोपले होते. रात्री १ ते २.३० वाजताच्या दरम्यान २० ते ३० वयोगटातील दोन अनोळखी आरोपींनी त्यांच्या बाथरुमकडील दरवाजाला कटरच्या साह्याने छिद्र पाडून आत प्रवेश केला. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा ९५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

Web Title: 9 5 thousand people have died due to the weapon