भांडुपच्या शिधावाटप केंद्रावर धाड अवैधरित्या साठविलेला ९४४ किलो गहू जप्त
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:15+5:302014-12-20T22:28:15+5:30
भांडुपच्या शिधावाटप केंद्रावर धाड

भांडुपच्या शिधावाटप केंद्रावर धाड अवैधरित्या साठविलेला ९४४ किलो गहू जप्त
भ ंडुपच्या शिधावाटप केंद्रावर धाडअवैधरित्या साठविलेला ९४४ किलो गहू जप्तमुंबई: भांडुपच्या एका शिधावाटप केंद्रावर धाड घालून शिधावाटप अधिकार्यांनी तब्बल ९४४ किलो अवैध गहू जप्त केला. या प्रकरणी भांडुप पेालिसांनी केंद्र चालकाला अटक केली आहे. तर शिधावाटप अधिकार्यांनी केंद्राला सील ठोकले आहे.भांडुप पश्चिमेकडील काजू टेकडी परिसरातील शिधावाटप केंद्र ३० ई १४४ वर ही कारवाई करण्यात आली. या केंद्रातून वाटप होणार्या धान्यात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकार्यांकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत भांडुपच्या शिधावाटप अधिकारी का. नि. शानबाग यांच्या पथकाने काल संध्याकाळी आठच्या सुमारास संबंधीत केंद्रावर धाड घातली. झाडाझडतीत ९४४ किलो गहूसाठा आढळून आला. पथकाने तिथल्या तिथेकेंद्राचा परवाना रदद केला. अवैधरित्या साठवून ठेवलेला गहू ताब्यात घेतला आणि केंद्राला सील ठोकले. या प्रकरणी पथकाने भांडुप पोलीस ठाण्यात केंद्रचालक सुभाष गुप्ता याच्याविरोधात धान्य अवैधरित्या साठवून ठेवल्याबददल तक्राार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुप्ताला अटक केली.