शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? अर्थ मंत्रालयाने स्पष्टच सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:11 IST

सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत.

8th Pay Commission: देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. अनेक वर्षांपासून देशभरातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते. पण, आठवा वेतन लागू करण्याबाबत सध्या तरी सरकारची कुठलीच योजना नसल्याचे अर्थमंत्र्यालयाने आज(3 डिसेंबर 2024) जाहीर केले आहे. 

अर्थ मंत्रालयाचे काय म्हटले?राज्यसभा खासदार जावेद अली खान आणि रामजी लाल सुमन यांनी विचारले की, केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये नवीन वेतन आयोगाबाबत घोषणा करण्याचा विचार करत आहे का? यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, सध्या 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर विचाराधीन नाही. 

अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची मागणी7 व्या वेतन आयोगाने वेतन रचना, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली होती. यामध्ये वेतनाच्या समानतेलाही प्राधान्य दिले होते. त्यामुळेच सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8 व्या वेतन आयोगाची मागणी करू लागले. अनेक दिवसांपासून आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची वाट पाहत होते. पण, आता सरकारच्या उत्तराने सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे. सध्या तरी नवीन वेतन आयोग स्थापन होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

8वा वेतन आयोग कधी लागू होणार?साधारणपणे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि सुविधांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यात बदल करण्याच्या सूचना देण्यासाठी दर 10 वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते. महागाई दर आणि इतर बाह्य घटक लक्षात घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. 28 फेब्रुवारी 2014 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली आणि 19 नोव्हेंबर 2015 रोजी त्याचे निकाल सादर केले. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2016 मध्ये आल्या होत्या आणि 10 वर्षांच्या दृष्टीने 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार