शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी पंचायतींना 8,900 कोटी, केंद्राची मोठी मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 04:58 IST

देशभरातील सर्व तीन टीयर पंचायतराज संस्था, गावे, ब्लॉक आणि जिल्ह्यांसाठी हा निधी आहे. चालू आर्थिक वर्षातील अनुदानाचा हा पहिला हप्ता आहे. त्यातून मिळणारा निधी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी वापरायचा आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन केंद्र सरकारने ग्रामीण भागाला आगाऊ अनुदान देण्यासाठी २५ राज्यांना ८९२३.८ कोटी रुपयांचा निधी पाठवला आहे. यात उत्तर प्रदेशला सर्वाधिक १,४४१ कोटी, तर महाराष्ट्राला ८६१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.देशभरातील सर्व तीन टीयर पंचायतराज संस्था, गावे, ब्लॉक आणि जिल्ह्यांसाठी हा निधी आहे. चालू आर्थिक वर्षातील अनुदानाचा हा पहिला हप्ता आहे. त्यातून मिळणारा निधी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी वापरायचा आहे. ग्रामीण भागात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक उपकरणे तसेच संसाधने गोळा करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. प्रत्यक्षात हा निधी १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार जूनमध्ये द्यायचा होता. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो एक महिना आधीच देण्यात निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला. हा निधी देण्यासाठी वित्त आयोगाच्या काही अटी आहेत. मात्र, पहिल्या हप्त्यासाठी त्या शिथिल करून निधी पुरविण्यात आला आहे.

अन्य राज्यांना मिळालेला निधी असाइतर राज्यांपैकी बिहारला ७४१.८ कोटी, पश्चिम बंगालला ६५२.२ कोटी, मध्य प्रदेशला ५८८.८ कोटी, राजस्थानला ५७०.८ कोटी, तामिळनाडूला ५३३.२ कोटी, कर्नाटकला ४७५.४ कोटी, गुजरातला ४७२.४ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी