शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८८ टक्के गर्भवती लक्षणविरहित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:55 AM

अभ्यासातील निरीक्षण; प्रसूतीवेळी इतरांना लागण होण्याचा धोका

मुंबई : कोरोनासंदर्भात गर्भवती महिलांच्या केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना पॉझिटिव्ह ८८ टक्के गर्भवती महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसल्याचे समोर आले आहे. या महिलांच्या कोरोना चाचण्या न केल्यास, त्यांच्यामुळे प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय कर्मचारी, तसेच वॉर्डमधील इतर शिशू, त्यांच्या मातांना कोरोनाचा धोका होऊ शकतो.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ-परळने ‘मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज’सह एक प्रेग कोविड नावाचा नोंदणी विभाग तयार केला आहे. यामध्ये राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, तसेच मुंबईतील नायर रुग्णालयात येणाऱ्या महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यानुसार, राज्यात २५ एप्रिल ते २० मे दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय, तसेच नायर रुग्णालयातील गर्भवती महिलांची माहिती संकलित करण्यात आली. या काळात रुग्णालयात १,१४० महिला दाखल झाल्या होत्या, ज्यात ३२१ महिलांना कोरोना झाला होता. यातील केवळ ३७ महिला म्हणजेच ११.५ टक्के महिलांना कोरोनाची लक्षणे होती, असे प्रमुख अभ्यासक, आयसीएमआर-एनआयआरआरएचचे प्रमुख डॉ. राहुल गजभिये म्हणाले. लक्षणे असणाºया महिलांना ताप, थंडी, जुलाब, श्वास घेण्यास त्रास, वास घेण्याची क्षमता कमी झाच्या तक्रारी होत्या. आयसीएमआरने या सर्व महिलांची कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. त्यानंतर, निरीक्षणे नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.अधिक खबरदारी घेणे गरजेचेच्आयसीएमआर-एनआयआरआरएचच्या संचालिका डॉ.स्मिता महाले, डॉ.राहुल गजभिये, डॉ.दीपक मोदी, नायर रुग्णालयातील डॉ.नीरज महाजन, तसेच एमईडीडीचे डॉ.राकेश वाघमारे आदींनी या अभ्यासात सहभाग नोंदविला.च्गर्भवती महिलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्या अतिजोखमीच्या वर्गवारीत येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत त्यांना अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpregnant womanगर्भवती महिला