शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या खिशात ८६% देणग्या, काँग्रेसच्या वाट्याला केवळ १२ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 05:15 IST

विविध कंपन्यांनी देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भाजपच्या वाट्याला आले आहेत.

नवी दिल्ली - विविध कंपन्यांनी देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भाजपच्या वाट्याला आले आहेत. त्यापैकी एका ट्रस्टनेच भाजपला १५४ कोटी, तर काँग्रेसला १0 कोटी दिले आहेत. प्रादेशिक पक्षांपैकी बिजू जनता दलाला काँग्रेसपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत.या आर्थिक वर्षात ट्रस्टनी राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी एकूण २९०.२२ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. भाजपनंतर बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षाला दोन ट्रस्टकडून १३ कोटी रुपयांचा निवडणूक निधी मिळालाआहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे देणग्या मिळण्याच्या बाबत काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर असून, त्याच्या पदरी फक्त १२ कोटी रुपये आलेआहेत. जनकल्याण ट्रस्टकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५० लाख आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला ४८ लाख रुपयांचा निवडणूक निधी मिळालाआहे.पूर्वीचा सत्या निवडणूक ट्रस्ट आता प्रूडंट निवडणूक ट्रस्ट या नावाने ओळखला जातो. या ट्रस्टने मुख्यत्वे भाजप, काँग्रेस, बिजू जनता दल या तीन पक्षांना मिळून १६९.३ कोटी रुपयांच्या निवडणूक देणग्या दिल्या आहेत. त्यात भाजपला १५४.३ कोटी, काँग्रेसला १० कोटी व बिजू जनता दलाला ५ कोटी रुपये मिळाले.काही ट्रस्टकडून एक पैसाही नाहीनिवडणूक आयोगाकडे १५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत जमा असलेल्या माहितीनुसार एबी जनरल निवडणूक ट्रस्टने २०१७-१८ या वित्तीय वर्षात विविध पक्षांना २१.५ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. त्यात भाजपाला १२.५ कोटी, बिजू जनता दलाला ८ कोटी व काँग्रेसला १ कोटी रुपये मिळाले.ट्रायम्फ निवडणूक ट्रस्टने भाजपा व काँग्रेसला प्रत्येकी एक कोटी रुपये दिले. बाकीच्या निवडणूक ट्रस्टनी आपण एकाही पैशाची देणगी दिलेली नाही, असे जाहीर केले आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण