एसी वापरला म्हणून ८५ वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 16:01 IST2016-04-09T16:01:28+5:302016-04-09T16:01:28+5:30
एसीचा वापर केल्यानं तसंच वीजबिल नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार सूचना देऊनही न ऐकल्याने 85 वर्षीय वृद्धाने आपली पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे

एसी वापरला म्हणून ८५ वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलाची हत्या
>ऑनलाइन लोकमत -
केरळ, दि. ९ - एसीचा वापर केल्यानं तसंच वीजबिल नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार सूचना देऊनही न ऐकल्याने 85 वर्षीय वृद्धाने आपली पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पॉल यांनी आपल्या 74 वर्षीय पत्नीची आणि 54 वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पॉल निवृत्त रेल्वे अधिकारी असून पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत.
पॉल यांनी पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर कतारमध्ये राहणा-या आपल्या मुलाला फोन करुन आपण हत्या केल्याची माहिती दिली. तसंच आपणही आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्यांच्या मुलाने ताबडतोब शेजारी राहणा-या नातेवाईकांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर त्यांनी पोलिसांनी कळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वीजबिल प्रमाणापेक्षा जास्त येत असल्याने पॉल यांनी एसीचा वापर न करण्यास सांगितलं होतं. मात्र तरीही त्यांची पत्नी आणि मुलाने रात्री एसी सुरु केला होता. त्यांच्या मुलाचं नकुतंच ऑपरेशनदेखील झालं होतं.
एसी सुरु केल्याच्या रागात पॉल यांनी पत्नी आणि मुलगा झोपेत असताना सळीने त्यांच्यावर हल्ला केला ज्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पॉल यांनी छताला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वय जास्त असल्याने त्यांनी शिडीवर चढता आलं नाही आणि त्यांचा प्रयत्न फसला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.