शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन : तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग; सोनिया गांधी यांनीच गाजवला पहिला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 02:18 IST

राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणानेच. राहुल गांधी यांनी छोटेखानी उद्घाटनपर भाषण करतानाच, आपण समारोपाच्या वेळी सविस्तर बोलणार आहोत, असे सांगून कार्यकर्ते व नेत्यांची उत्सुकता वाढवून ठेवली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणानेच. राहुल गांधी यांनी छोटेखानी उद्घाटनपर भाषण करतानाच, आपण समारोपाच्या वेळी सविस्तर बोलणार आहोत, असे सांगून कार्यकर्ते व नेत्यांची उत्सुकता वाढवून ठेवली. सोनिया गांधी यांनी केलेल्या उस्फूर्त आक्रमक भाषणामुळे नेते व कार्यकर्तेही भारावून गेले.मी खाणार नाही व खाऊ देणार नाही, असे मोदी सांगत होते. पण ते नाटक होते. मते व सत्ता मिळवण्याचा तो एक डाव होता, हे लोकांना आता लक्षात आले आहे, असे सांगून मोदी सरकार सीबीआय, ईडी यंत्रणांचा सर्रास दुरूपयोग करीत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला.काँग्रेसला संपवण्यासाठी सरकार बनावट खटले दाखल करीत आहे. पण मोदी यांनी साम, दाम, दंड व भेदाचा कितीही वापर केला तरी काँग्रेस त्यापुढे वाकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला ठणकावले. सरकार संसदेचा अनादर करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. यूपीए सरकारने सुरू केलेल्या योजना कमकुवत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.मोदी सरकारने निर्माण केलेल्या स्थितीला तोंड देण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. देशासमोर मोठी आव्हाने असताना राहुलने ्पक्षाध्यक्षपद स्वीकारले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपण स्वत: पक्षासाठी काय करू शकतो हे निश्चित केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.सोनिया गांधी यांनी १९ वर्षांपूर्वी आपण कोणत्या स्थितीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला हे सांगितले. त्या म्हणाल्या की, मला राजकारणात यायचे नव्हते. परंतु, काँग्रेस दुबळी होत असल्याने व पक्षाचे मूलभूत सिद्धांत संकटात सापडल्याने अध्यक्षपद स्वीकारायचा निर्णय मी घेतला.काँग्रेस घेणार व्यावहारिक भूमिकाकाँग्रेसने शनिवारी भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी तसेच समान व राबवता येईल असा कार्यक्रम तयार करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत सहकार्य करण्याची व्यावहारिक भूमिका घेण्याचा निश्चय केला. भाजपशी एकत्रितपणे लढण्यास वेगवेगळ््या विरोधी पक्षांमध्ये सहमती घडवण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या प्रयत्नांतून निवडणूकपूर्व मैत्रीचे संकेत मिळतात.परदेशातील राजकीय प्रतिनिधी : अधिवेशनाच्या व्यासपीठावर नेत्यांची चित्रे नव्हती. स्टेडियममधील फलकांवर राहुल गांधी यांचेच छायाचित्र होते. सोनिया गांधी यांचेही छायाचित्र नव्हते. काँग्रेसने यंदा विविध देशातील राजकीय पक्षांना आमंत्रित केले. त्यामुळे चीनसह जवळपास डझनभर देशांचे प्रतिनिधी तिथे होते.कुमार केतकर व्यासपीठावर : ज्येष्ठ पत्रकार व चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले कुमार केतकर यांच्याकडे या अधिवेशनाचे सूत्रसंचालन होते. केतकर यांना राहुल गांधी यांच्या टीममध्ये महत्त्वाचे स्थान असेल, हे त्यातून जाणवले.पासवान यांच्याशी संपर्क : बिहार व उत्तर प्रदेशात महाआघाडीची काँग्रेसची इच्छा आहे. रामविलास पासवान यांनी दलित, आदिवासी खासदारांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. काँग्रेसनेही याला संमती दिली होती. काँग्रेसच्या एका नेत्याने पासवान यांच्याशी अप्रत्यक्ष संपर्क साधणे सुरु केले आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस