८४ वर्षीय वृध्देचा विनयभंगामुळे मृत्यू ?
By Admin | Updated: May 2, 2014 14:50 IST2014-05-02T14:27:16+5:302014-05-02T14:50:35+5:30
केरळ मधील तिरुअनंतपूरम येथे ८४ वर्षीय वृध्देचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

८४ वर्षीय वृध्देचा विनयभंगामुळे मृत्यू ?
ऑनलाइन टीम
तिरुअनंतपूरम, दि. २ - केरळ मधील तिरुअनंतपूरम येथे ८४ वर्षीय वृध्देचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर केरळ पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात ८४ वर्षीय वृध्द महिला एकट्याच घरी राहायच्या. दोन दिवसांपूर्वी त्या घरात बेशुध्दावस्थेत आढळल्या होता. यानंतर शेजा-यांनी त्या वृध्देला रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी वृध्देचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवालात मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे. वृध्देचा विनयभंग झाला होता व यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या घटनेमुळे केरळमध्ये खळबळ माजली आहे.