महाराष्ट्रात सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना
By Admin | Updated: December 10, 2014 23:59 IST2014-12-10T23:59:50+5:302014-12-10T23:59:50+5:30
महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर्पयत सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना घडल्या़ या घटनांमध्ये 12 जणांनी आपला जीव गमावला तर 165 जण जखमी झाल़े

महाराष्ट्रात सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना
12 जण मृत्युमुखी : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला सरकारचे उत्तर, उत्तर प्रदेश सर्वात पुढे
नवी दिल्ली : महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर्पयत सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना घडल्या़ या घटनांमध्ये 12 जणांनी आपला जीव गमावला तर 165 जण जखमी झाल़े
गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी बुधवारी राज्यसभा खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली़ 5 फेब्रुवारी 2क्14 रोजी ‘सांप्रदायिक हिंसाचार (निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5’ राज्यसभेतून मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल़े
देशात सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का? असा प्रश्न खा़ दर्डा यांनी विचारला होता़ देशातील विविध भागांत सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांची यावर्षीची तसेच गेल्या तीन वर्षाची तुलनात्मक आकडेवारी त्यांनी मागितली होती़ सोबतच सांप्रदायिक हिंसाचार विधेयक संमत करण्यासंदर्भात सरकारचा इरादा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता़
या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल रिजिजू यांनी देशाच्या विविध भागांतील 2क्11 ते ऑक्टोबर 2क्14 या काळातील सांप्रदायिक घटनांची आकडेवारी सादर केली़ शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी देशात सांप्रदायिक घटनांमध्ये सुमारे 19 टक्क्यांची घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली़
रिजिजू यांनी सांगितले की, 5 डिसेंबर 2क्क्5 रोजी राज्यसभेत ‘सांप्रदायिक हिंसाचार (निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5’ सादर केले गेले होत़े मात्र अनेक वेळा सूचना देऊनही या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली नाही़ यानंतर ‘सांप्रदायिक हिंसाचार निवारण(न्याय मिळवून देणो आणि नुकसानभरपाई) विधेयक, 2क्13’ नावाने नवे विधेयक तयार केले गेल़े हे विधेयक राज्यसभेत सादर करणो आणि जुने ‘सांप्रदायिक हिंसाचार(निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5 ’ मागे घेण्यासाठी सभागृहात 17 डिसेंबर 2क्13 आणि 2क् जानेवारी 2क्14 रोजी नोटीस देण्यात आली राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर ‘सांप्रदायिक हिंसाचार निवारण(न्याय मिळवून देणो आणि नुकसानभरपाई) विधेयक, 2क्14’ सादर करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला़ 5 फेब्रुवारी 2क्14 रोजी ‘सांप्रदायिक हिंसाचार(निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5’ मागे घेण्यात आल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशभरात 561 घटना; 9क् ठार तर 1688 जखमी
4यावर्षी देशात सांप्रदायिक हिंसाचाराच्या एकूण 561 घटना नोंदवल्या गेल्या़ या घटनांमध्ये एकूण 9क् लोक ठार तर 1688 जण जखमी झाल़े यंदा सांप्रदायिक हिंसाचाराच्या सर्वाधिक 129 घटना उत्तर प्रदेशात घटल्या़ यात 25 लोक मृत्युमुखी पडले तर 364 लोक जखमी झाल़े
4महाराष्ट्र यात दुस:या क्रमांकावर राहिल़े राजस्थानात अशा 61 घटना नोंदवल्या गेल्या़ यात 13 लोकांचा बळी गेला तर 116 जखमी झाल़े यंदा गुजरातेत सांप्रदायिक हिंसाचाराच्या 59 घटनांमध्ये 8 जण मृत्युमुखी पडले तर 172 जण जखमी झालेत़ बिहारात 51 घटनांमध्ये चार ठार तर 267 जण जखमी झाल़े