जनधनचे जिल्ात ८.१३ लाख खातेधारक
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:00+5:302015-02-13T23:11:00+5:30
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनधन योजनेतून नागपूर जिल्ात आतापर्यंत ८ लाख १३ हजार ४९६ खाती उघडण्यात आली आहे.

जनधनचे जिल्ात ८.१३ लाख खातेधारक
न गपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनधन योजनेतून नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख १३ हजार ४९६ खाती उघडण्यात आली आहे.मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असून ती त्यांनी १५ ऑगस्ट २०१४ ला दिल्लीच्या लाल किल्ल्याहून जाहीर केली होती. २८ ऑगस्ट २०१४ पासून ती देशभर लागू करण्यात आली होती. नागपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागपूर जिल्ह्याला ८ लाख २१ हजार २३४ खाते उघडण्याचे उदिष्ट होते. त्यातुलनेत ८ लाख १३ हजार ४९६ खाती (९९ टक्के) उघडण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खातेधारकांना एक लाखाचा व्यक्तिगत दुर्घटना विमा आणि इतरही काही लाभ मिळणार आहेत. (प्रतिनिधी)