13 वर्षाच्या मुलीवर आठ शिक्षकांनी केला सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: March 26, 2017 18:53 IST2017-03-26T18:53:53+5:302017-03-26T18:53:53+5:30

राज्यस्थानातील बिकानेरमध्ये आठ शिक्षकांनी 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

8-year-old girl gangrape rape | 13 वर्षाच्या मुलीवर आठ शिक्षकांनी केला सामूहिक बलात्कार

13 वर्षाच्या मुलीवर आठ शिक्षकांनी केला सामूहिक बलात्कार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - राज्यस्थानातील बिकानेरमध्ये आठ शिक्षकांनी 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पडितेच्या आई-वडिलांनी त्या शिक्षकांविरोधात काल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. नराधम शिक्षकांनी मुलीला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या असून या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मुलीला कर्करोग झाल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. सध्या आठही शिक्षक पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.

अतिरिक्त तासाच्या नावाखाली शाळा सुटल्यावर नराधम शिक्षक पीडितेला शाळेत थांबवून ठेवायचे. पिडितेला एका खोलीत नेले जायचे आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले जायचे. नराधमांनी पीडितेचा अश्लील व्हिडीओदेखील तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल केले जायचे. पीडितेने भीती पोटी पालकांना हा प्रकार सांगितला नाही. दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरुच होते. दुर्दैवी बाब म्हणजे पीडितेच्या पालकांना हा प्रकार समजला होता. मात्र पोलीस तक्रार केल्यास समाजात नाचक्की होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसांकडे जाणे टाळले. सध्या पीडितेवर बीकानेरमधील कर्करोग रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: 8-year-old girl gangrape rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.