शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आठ वर्षांच्या मुलीनं समजावला राफेल करार; संरक्षणमंत्र्यांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 10:18 IST

निर्मला सीतारामन यांच्याकडून मुलीचं कौतुक

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राफेल डीलचा मुद्दा चर्चेत आला आहे. राफेल डील नेमकं आहे तरी काय, हे समजावून सांगणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विट केला आहे. या मुलीनं कंपास पेटीच्या मदतीनं संपूर्ण राफेल डील स्पष्ट करुन सांगितलं आहे. याबद्दल सीतारामन यांनी मुलीचे आभार मानले आहेत. राफेल विमानाची यूपीए आणि एनडीए सरकारच्या काळातील किंमत, त्यातील फरक एका आठ वर्षीय मुलीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. यासाठी त्यांनी मुलीचे आभारही मानले आहेत. 'मी राफेलचा मुद्दा सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट करु इच्छिते. ही पहिली कंपास पेटी (राफेल विमान) राहुल गांधींची आहे. ती रिकामी आहे आणि तिची किंमत आहे 720 कोटी रुपये. दुसरी कंपास पेटी मोदीजींची (राफेल विमान) आहे. ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. तिची किंमत आहे 1600 कोटी रुपये. एक गोष्ट राहुल गांधींच्या लक्षात येत नाही, ते ज्या किमतीबद्दल बोलत आहेत, ती केवळ विमानाची किंमत आहे. तर मोदीजींची विमानं शस्त्रास्त्रसज्ज आहेत,' अशा शब्दांमध्ये मुलीनं राफेल करार समजावला आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संरक्षणमंत्र्यांनी राफेल करार समजावणाऱ्या मुलीचं कौतुक केलं. 'या व्हिडीओसाठी मी या स्मार्ट मुलीला धन्यवाद देते. तुम्ही राफेल करारात जो रस घेतलात, त्यासाठी मी आपले आभार मानते. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एक दिवस हवाई दलात वैमानिक व्हाल,' अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी मुलीचं कौतुक केलं. गेल्या काही महिन्यांपासून राफेल डीलवरुन देशाच्या राजकारणात रणकंदन माजलं आहे. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही राफेलचा मुद्दा गाजला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या मुद्द्यावरुन वारंवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण प्रकरणावर संरक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र त्यानं काँग्रेसचं समाधान झालं नाही. संरक्षणमंत्र्यांनी अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले, अशी प्रतिक्रिया यानंतर काँग्रेसनं दिली होती. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभागRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा