शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 08:07 IST

त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले.

लखनऊः उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे. दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकात एक सीओ, एक एसओ, 2 एसआय आणि 4 जवान शहीद झाले असल्याचे परिसरातील डीएम यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी डीजीपी एचसी अवस्थी यांना दिले असून, त्यांनी घटनेचा अहवालही मागविला आहे. कानपूरमधील गुंडांच्या हल्ल्यात पोलीस शहीद झाल्यानंतर यूपीचे डीजीपी एचसी अवस्थी म्हणाले, 'जखमी झालेल्यांना शक्य तेवढे चांगले उपचार देणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. विकास दुबे हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यासाठी त्यांना शस्त्रे कोठून मिळाली, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्य डीजीपी म्हणाले की, जखमींना अधिक चांगले उपचार देण्याला आमचे प्राधान्य आहे. कानपूरची फॉरेन्सिक टीम आधीच घटनास्थळी पोहोचली आहे. लखनऊहून चौकशीसाठी फॉरेन्सिक टीमही पाठविण्यात आली आहे. गुंड आधीच घाबरून गेले होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे.या हिस्ट्रीशीटरला पकडण्यासाठी जेव्हा पोलीस पथक गेले, तेव्हा दुबे यांच्या टोळीतील गुंडांनी पोलिसांवरच गोळीबार केला. टोळीतील सदस्यांनी पोलिसांना घेराव घातला होता. पोलिसांना अशा हल्ल्याची अपेक्षा नव्हती. विकास दुबे येथून सुटल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी राज्यातील सर्व सीमा सील केल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश