८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात

By Admin | Updated: April 20, 2016 12:29 IST2016-04-20T10:46:38+5:302016-04-20T12:29:44+5:30

८ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणा-या आरोपीचे दोन्ही हात मुलीच्या पित्याने छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे

8-month-old girl raped, father killed by hand | ८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात

८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात

ऑनलाइन लोकमत - 
पंजाब, दि. २० -  अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणा-या आरोपीचे दोन्ही हात मुलीच्या पित्याने छाटल्याची धक्कादायक घटना भटींडा जिल्ह्यात घडली आहे. हा  नराधम आरोपी अल्पवयीन असून 2014मध्ये त्याने या चिमुरडीवर बलात्कार केला होता. याचा राग मनात ठेवून मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाचे दोन्ही हातच कापले आहेत.
 
पीडीत मुलगी आणि आरोपी दोघेही कोटली अबलू गावाचे रहिवासी आहेत. भटींडा जिल्हा न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. सुनावणी संपल्यानंतर घरी परतत असताना पीडीत मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला दुचाकीवरुन आपल्यासोबत येण्यास सांगितले. हे प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीची चर्चा करायची असल्याचं त्याला सांगितलं. झुंबा गावाजवळ पोहोताच पिडीत मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला झाडाला बांधलं आणि धारदार शस्त्राने त्याचे दोन्ही हात कापून टाकले. 
 
आरोपी तरुणाला भटींडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या शरीरावर इतर ठिकाणीही जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: 8-month-old girl raped, father killed by hand