ग्रामीण भागांत 8 लाख रोजगार

By Admin | Updated: December 12, 2014 01:34 IST2014-12-12T01:34:28+5:302014-12-12T01:34:28+5:30

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विदर्भातील युवकांना या वर्षी 31 नोव्हेंबर्पयत 1 कोटी 27 लाख 91 हजार रुपयांची माजिर्न मनी सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली.

8 million jobs in rural areas | ग्रामीण भागांत 8 लाख रोजगार

ग्रामीण भागांत 8 लाख रोजगार

राज्यसभेत उत्तर : विजय दर्डा यांच्या प्रश्नावर गिरीराज सिंग यांनी दिलेली माहिती
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विदर्भातील युवकांना या वर्षी 31 नोव्हेंबर्पयत 1 कोटी 27 लाख 91 हजार रुपयांची माजिर्न मनी सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे रोजगाराच्या 5क् संधी निर्माण झाल्या आणि 5क्क् लोकांना त्याचा लाभ मिळाला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राष्ट्रीय स्तरावर 2क्क्8-2क्क्9 च्या प्रारंभापासून 31 ऑक्टोबर 2क्14 र्पयत 5514.45 कोटी रुपयांच्या माजिर्न मनी साहाय्यतेतून या कार्यक्रमांतर्गत 2.85 लाख उद्योग स्थापन करण्यात आले आणि त्यामुळे 24.95 लाख लोकांसाठी अपेक्षित रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या, असे गिरीराज सिंग यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत वर्ष 2क्14-15 मध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागांत 8.25 लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यासोबतच खादी आणि ग्रामोद्योग आयोगानेही या कालावधीत खादी क्षेत्रच्या अंतर्गत 55 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
लघु आणि मध्यम उद्योग मंत्रलयाने विदर्भातील युवकांसाठी रोजगाराच्या कोणत्या योजना तयार केल्या आहेत, असा प्रश्न विजय दर्डा यांनी गिरीराज सिंग यांना विचारला होता. 
गिरीराज सिंग म्हणाले, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रलयाच्या माध्यमातून सरकार बिगर कृषी क्षेत्रत सूक्ष्म उद्योगांची स्थापना करून देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नोडल एजन्सीच्या रूपात खादी आणि ग्रामोद्योग आयोगासोबत (केव्हीआयसी) 2क्क्8-2क्क्9 पासून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) नावाचा एक कर्जाशी संबंधित सबसिडी कार्यक्रम कार्यान्वित करीत आले आहे. या प्रकल्पांतर्गत बांधकाम क्षेत्रत किमान लागत 25 लाख रुपये आणि सेवा क्षेत्रत 1क् लाख रुपये आहे.
 
श्रीलंकेत चीनच्या वाढत्या प्रभावावर भारताची नजर
च्चीन श्रीलंकेत झपाटय़ाने पाय पसरत असून त्यावर भारताची नजर आहे. भारताच्या सुरक्षा स्वास्थ्यावर त्याचा विशेष प्रभाव पडलेला नाही, असे विदेश राज्यमंत्री जन. (निवृत्त) व्ही. के. सिंग यांनी  खा. दर्डा यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले. अन्य देशांसोबतचे भारताचे संबंध पूर्णपणो स्वयंनिर्भर असून तिस:या देशाला त्यात कोणतेही स्थान नाही.
 
च्सुरक्षा व्यवस्थेवर प्रभाव पाडणा:या सर्व घडामोडींवर भारताने कायम नजर ठेवलेली आहे. सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होत असेल तर बचाव करण्यासाठी सर्व अपेक्षित उपाययोजना केल्या जातात. चीनने श्रीलंकेत झपाटय़ाने पाय पसरले आहे हे सरकारला माहीत आहे काय? चीनच्या या पावलामुळे भारताच्या किनारपट्टी भागात गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याची सरकारला जाणीव आहे काय, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.
 
च्चीनच्या अध्यक्षांनी 16 आणि 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या दौ:यावर असताना 27 करारांवर स्वाक्षरी केली आहे. 2क्क्9 मधील श्रीलंकेतील गृहकलह संपुष्टात आल्यानंतर चीन हा श्रीलंकेचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा आर्थिक भागीदार राहिलेला आहे. गेल्यावर्षी 2क्13 मध्ये श्रीलंका- चीनने द्विपक्षीय व्यापार 3.क्85 अब्ज अमेरिकन डॉलरवर नेला आहे, अशी माहिती जन. सिंग यांनी दिली.

 

Web Title: 8 million jobs in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.