शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून १८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

By बाळकृष्ण परब | Updated: January 3, 2021 16:51 IST

Accident News : स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये घडली मोठी दुर्घटना स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात झाला सुमारे ८ जणांचा मृत्यू स्मशानमधील शेडचे छप्पर कोसळून सुमारे २० ते २५ जण त्याखाली अडकले

गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात ही दुर्घटना घडली. घटनास्थळावरील छायाचित्रे व्हायरल झाली असून, त्यामध्ये अनेकजण छताखाली अडकलेले दिसत आहेत. गाझियाबाद पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम घटनास्थळावर दाखल झाली असून, मदतकार्य सुरू आहे. आज सकाळपासूनच दिल्ली आणि एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, मुरादनगर येथील स्मशानभूमीत काही जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी आले होते. पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उखलारसी गावातील एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आला होता. या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थित लोकांनी शताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी स्मशानमधील शेडचे छप्पर कोसळून सुमारे २० ते २५ जण त्याखाली अडकले. यामधील ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश