शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बस दरीत कोसळली, आंध्र प्रदेशातील अपघातात ८ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 06:22 IST

अपघातात ठार झालेले सर्व एकमेकांचे नातेवाईक होते आणि ते अनंतपुरमू जिल्ह्याचे होते

तिरुपती : आंध्र प्रदशातील चित्तूर जिल्ह्यातील भाकरापेटमध्ये शनिवारी रात्री  भरधाव बस दरीत कोसळून  झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार, तर  अन्य ४४ जण जखमी झाले.  घाटात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला, असे पोलिसांनी सांगितले.

अपघातात ठार झालेले सर्व एकमेकांचे नातेवाईक होते आणि ते अनंतपुरमू जिल्ह्याचे होते. रविवारी सकाळी आयोजित विवाहसोहळ्यासाठी ते धर्मावरमहून तिरुपतीला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृतांमध्ये एका  स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे. अंधारामुळे बचाव कार्याला खूप वेळ लागला, असे पोलिसांनी सांगितले. तिरुपतीचे पोलीस अधीक्षक सीएच. व्ही. अप्पला नायडू आणि पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन जखमींना रस्सीच्या मदतीने बाहेर काढले आणि इस्पितळात दाखल केले. नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

  आंध्र प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले आहे.   राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी, तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष एस. विष्णुवर्धन रेड्डी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एस. सैलजनानाथ आदींनी शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेश