एस.टी.चे ८९ कर्मचारी सेवानिवृत्त होणार

By Admin | Updated: May 30, 2016 00:37 IST2016-05-30T00:37:51+5:302016-05-30T00:37:51+5:30

जळगाव- राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापनदिन १ जून रोजी परिवहन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहे. दरम्यान ३१ मे रोजी जळगाव विभागातून एकूण ८९ कर्मचारी व जळगाव आगारातून १३ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. अशी माहिती गोपाळ बी.पाटील यांनी दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापनदिन परिवहन दिन म्हणून १ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बसस्थानक व आगार परिषद स्वच्छ व सुशोभित ठेवणे, बसस्थानकावरुन सुटणार्‍या गाड्यातील प्रवाशांना गुलाबपुष्प व थंडपेय देवून स्वागत करण्यात येणार आहे. सर्व बसस्थानकावरुन ध्वनीप्रक्षेकाद्वारे महामंडळ विविध योजना व सुविधांची माहिी देणे, सदर दिवसाचे औचित्य साधून आगारातून डिझेल बचत करणारे पाच चालक, जास्तीत जास्त उपन्न देणारे पाच वाहक, ज्यांची हजेर

8 9 employees of ST will retire | एस.टी.चे ८९ कर्मचारी सेवानिवृत्त होणार

एस.टी.चे ८९ कर्मचारी सेवानिवृत्त होणार

गाव- राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापनदिन १ जून रोजी परिवहन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहे. दरम्यान ३१ मे रोजी जळगाव विभागातून एकूण ८९ कर्मचारी व जळगाव आगारातून १३ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. अशी माहिती गोपाळ बी.पाटील यांनी दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापनदिन परिवहन दिन म्हणून १ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बसस्थानक व आगार परिषद स्वच्छ व सुशोभित ठेवणे, बसस्थानकावरुन सुटणार्‍या गाड्यातील प्रवाशांना गुलाबपुष्प व थंडपेय देवून स्वागत करण्यात येणार आहे. सर्व बसस्थानकावरुन ध्वनीप्रक्षेकाद्वारे महामंडळ विविध योजना व सुविधांची माहिी देणे, सदर दिवसाचे औचित्य साधून आगारातून डिझेल बचत करणारे पाच चालक, जास्तीत जास्त उपन्न देणारे पाच वाहक, ज्यांची हजेरी व वर्तणूक चांगली आहे अशा पाच यांत्रीक कर्मचार्‍यांचा व इतर बाबी लक्षात घेवून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळी १० ते ५ दरम्यान सर्व आगारांमध्ये कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हे उपक्रम राबविले जाणार आहेत.
जळगाव विभागातून विभागातून १ मे रोजी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यात चालक, वाहक, यांत्रीकी कर्मचारी व प्रशासकीय कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सेवानिवृत्त होणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचा सत्कार बसस्थानकाच्या आवारात सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. बसदिन साजरा करणार १ जून हसा दिवस बस दिन म्हणून जळगाव विभागात साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी प्रवाशांचे स्वागतही केेले जाणार आहे. जळगाव जिल्‘ातील प्रवाशांनी त्यादिवशी एसटीनेच प्रवास करावा, खासगी गाडीतून प्रवास करु नये , प्रवास करताना काही सुधारणा करावयाच्या असल्यास वाहकाकडून सुचना नोंदवही घेवून तशी नोंद करावी, व सदर नोंदीची राज्य परिवहन महामंडळ दिलेल्या सुधारणांच्या व सुचनेबाबत दखल घेवून १० जूनपर्यंत संबंधितांना कळविण्यात येईल व सुधारणा करण्यात येणार आहे. ३१ मे व १ जूनच्या कार्यक्रमांना स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहण्याचे आवाहन आागर व्यवस्थापक एस.बी.खडसे यांनी केलेले आहे.

Web Title: 8 9 employees of ST will retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.