शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 14:42 IST

या निर्णयामुळे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. नरेंद्र मोदी सरकारनेजम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्र शासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार, सर्व भत्ते लागू करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील कर्मचाऱ्यांना हा भत्ता येत्या 31 ऑक्टोबर 2019 पासून देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रवासी भत्ता, वैद्यकीय भत्ता, मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता यांसारखे भत्ते देण्यात येणार आहेत.  या निर्णयामुळे 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक आदेश जारी केले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट दिले होते. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि वाहतूक खर्चा संबंधित मोठा निर्णय घेतला होता.  कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता मध्ये 5 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या निर्णयानंतर महागाई भत्ता 12 टक्क्यांनी वाढवून 17 टक्के झाला आहे. त्यामुळे असे सांगण्यात येत आहे की, या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 16 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळीladakhलडाखEmployeeकर्मचारी