मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त ७७ दिवसांचे 'हवन'
By Admin | Updated: February 4, 2016 16:56 IST2016-02-04T16:45:24+5:302016-02-04T16:56:13+5:30
समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचा ७७ वा वाढदिवस येत्या २२ नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोध्येतील राम मंदिरात ७७ दिवसांचे हवन आयोजित करण्यात आले आहे.

मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त ७७ दिवसांचे 'हवन'
ऑनलाइन लोकमत
फैजाबाद, दि. ४ - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचा ७७ वा वाढदिवस येत्या २२ नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोध्येतील राम मंदिरात ७७ दिवसांचे हवन आयोजित करण्यात आले आहे.
येत्या ६ फेब्रुवारीपासून हवनचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये खासदार धर्मेंद यादव,विधानपरिषदेचे सभापती प्रसाद पांडे, राज्य वनमंत्री तेज नारायण पांडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त ७७० झाडांची लागवड सुद्धा करण्यात येणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि स्थानिक समाजवादी पार्टीचे नेते आशिष पांडे यांनी सांगितले की, येत्या ६ फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या मंदिरात प्रत्येक दिवशी हवन चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, मस्जिद, चर्च, गुरुद्वार आणि मंदिरामध्ये प्रार्थना करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन आणि गरजू लोकांना गरम कपडे आणि ब्लॅंकेटचे वितरण करण्यात येणार आहे.