स्टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूक
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:33+5:302015-01-22T00:07:33+5:30
स्टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूक

स्टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूक
स टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूकगुन्हा दाखल : परचेस मॅनेजर असल्याचे सांगून खरेदी केले लोखंडनागपूर : सिमेंट प्रोजेक्ट इंडिया कंपनीत परचेस मॅनेजर असल्याचे सांगून ७.६८ लाखाचे १६ टन लोखंड खरेदी करून त्याची रक्कम संबंधित दुकानदारास न देणाऱ्या आरोपीविरुद्ध तहसिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विनोद राय रा. प्लॉट नं. १७१, सी-३, सिडको एमआयडीसी औरंगाबाद आणि जे. के. कटलरी येथील आरोपींनी संगनमत करून धारस्कर रोड इतवारी येथील जमनादास स्टील प्रा. लि. कंपनीला आपण सिमेंन्स प्रोजेक्ट इंडिया प्रा. लि. कंपनीत परचेस मॅनेजर असल्याचे सांगितले. त्यांनी कंपनीचे खोटे कागदपत्र ई मेल द्वारा पाठवून जमनादास स्टील कंपनीकडून १६ टन लोखंडी अँगल किंमत ७ लाख ६८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला. त्यांनी मालाचे पैसे परत न करता कंपनीची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चेतन विनय उदेशी (३५) रा. प्लॉट नं. ४५, द्वारकामाई अपार्टमेंट, जैन मंदिरासमोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)................