कोराडी मंदिरात ७५०० अखंड मनोकामना ज्योती
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
(फोटो)

कोराडी मंदिरात ७५०० अखंड मनोकामना ज्योती
(फ ोटो)कोराडी मंदिरात ७५०० अखंड मनोकामना ज्योतीश्री जगदंबा संस्थानची आढावा सभा : नवरात्र उत्सवाच्या तयारीवर चर्चाकोराडी : स्थानिक श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची आढावा बैठक शनिवारी मंदिराच्या सभागृहात पार पडली. त्यात आगामी नवरात्र उत्सवाच्या तयारीसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली असून, यावर्षी मंदिराच्या ज्योतीभवनात ७५०० अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री तथा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आगामी अश्विन नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली. मंदिराच्या परिसरात प्रलंबित असलेल्या काही विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मंदिरातील विजेची व्यवस्था, विद्युत रोशनाई, घटाचे नारळ, फूल, हार, तेलाचे पिंप, केबल नेटवर्क, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आदींबाबतच्या निविदा तसेच हलव्याचा प्रसाद वितरित करणे, ज्योतीभवनात ७५०० अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करणे, या अखंड ज्योतीचे बुकिंग मंदिरातच करणे, बुकिं गपोटी भाविकांकडून ५५१ रुपये संस्थानच्या कार्यालयात जमा करणे, त्यासाठी काऊंटर सुरू करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मागील नवरात्र उत्सवादरम्यान ६२५१ अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. यावर्षी नवरात्र उत्सव मंगळवारपासून (दि. १३ सप्टेंबर) सुरू होत आहे. त्यामुळे मंदिरात पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने भाविकांच्या विविध सुविधांवरही चर्चा करण्यात आली. या सभेला संस्थानचे उपाध्यक्ष दयाराम तळसकर, सचिव केशव फुलझेले, बाबूूराव भोयर, डी. जी. चन्ने, नारायण जामदार, प्रेमलाल पटेल, अशोक खानोरकर, नंदू बजाज, ॲड. मुकेश शर्मा, स्वामी निर्मलानंद, दत्तू समरीत, नंदिनी त्रिपाठी आदी विश्वस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)***