लोकन्यायालयात ७२७ प्रकरणे निकाली
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:09+5:302015-02-18T00:13:09+5:30
फोटो आहे.....

लोकन्यायालयात ७२७ प्रकरणे निकाली
फ टो आहे.....नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्हा न्यायालयात आयोजित विशेष राष्ट्रीय लोकन्यायालयात ३७७५ पैकी ७२७ दावापूर्व प्रकरणे निकाली निघालीत.६१ लाख १३ हजार ६११ रुपयांच्या चलनक्षम पराक्रम्य लेख अधिनियम (चेक बाऊन्स) कलम १३८ मधील प्रकरणात तर, २ कोटी ७५ लाख ९८ हजार १४० रुपयांच्या दावापूर्व प्रकरणांत तडजोड झाली. सुनावणीसाठी ९ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये न्यायाधीश, मध्यस्थ वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश होता. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी लोकन्यायालयाचा आढावा घेतला. प्राधिकरणचे सचिव किशोर जयस्वाल, प्रभारी सचिव एस. बी. गावंडे यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते, वित्तीय संस्थेचे अधिकारी, पक्षकार आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.