शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:45 IST

११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.

नवी दिल्ली : ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच उच्च न्यायालयाचा हा निकाल अन्य प्रकरणांत उदाहरण म्हणून वापरता येणार नाही, असे स्पष्ट करीत न्या. एम.एम. सुंदरेश, न्या. एन. कोटिश्वसिंग यांच्या खंडपीठाने आरोपींना नोटीस जारी केली. 

काय म्हटले आहे राज्य सरकारच्या अपिलात?मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र सरकारच्या अपिलामध्ये अनेक गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. त्यात म्हटले आहे की, या खटल्यातील पुराव्यांमध्ये फारशी विसंगती नसतानाही मुंबई उच्च न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष केले.  कायदेशीर कारवाई करताना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) कलम २३(२) अंतर्गत असलेल्या सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. एका आरोपीकडे आरडीएक्स सापडल्याचा दावा तर केवळ काही तांत्रिक कारणावरून नाकारण्यात आला. 

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले? सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेता उच्च न्यायालयाने दिलेला वादग्रस्त निकाल कोणत्याही अन्य प्रकरणासाठी उदाहरण म्हणून वापरला जाऊ नये. त्या अनुषंगानेच अशा वादग्रस्त निकालाला स्थगिती दिली जाते.

लष्कर-ए-तय्यबाशी संगनमत करून बॉम्बस्फोट११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकल गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोटात १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पकडलेले आरोपी हे स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य आहेत.  त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाशी संगनमत करून बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले होते. यात आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे, उच्च न्यायालयाने म्हटले हाेते.

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईBombsस्फोटकेBlastस्फोट