७,००० कि.मी.चे नवे राष्ट्रीय महामार्ग बांधणार
By Admin | Updated: December 10, 2015 23:05 IST2015-12-10T23:05:43+5:302015-12-10T23:05:43+5:30
‘भारतमाला प्रकल्पा’अंतर्गत ७,००० कि.मी. लांबीचे नवे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.

७,००० कि.मी.चे नवे राष्ट्रीय महामार्ग बांधणार
नवी दिल्ली : ‘भारतमाला प्रकल्पा’अंतर्गत ७,००० कि.मी. लांबीचे नवे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत राज्य सरकारांशी विचारविनिमय करून ७,००० कि.मी. क्षेत्रात नवे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची योजना आहे. किनारपट्टी, सीमा भागांना जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्याचा भूपृष्ठ मंत्रालयाकडून आढावाही घेण्यात आला आहे, असे गडकरी यांनी सांगितले.