७० वर्ष जुने गणितातले सूत्र उलगडले, नीना गुप्तांचे अलौकिक यश
By Admin | Updated: January 11, 2016 18:52 IST2016-01-11T17:26:59+5:302016-01-11T18:52:42+5:30
जगभरातील गणितीतज्ज्ञांना जेरीस आणलेल्या ७० वर्षीय जुन्या गणितातील एका सूत्राला उलगडण्यात अखेर यश आले. भारतीय गणितीतज्ज्ञ नीना गुप्ता यांनी हे कठीण काम पार केले आहे.

७० वर्ष जुने गणितातले सूत्र उलगडले, नीना गुप्तांचे अलौकिक यश
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - जगभरातील गणितीतज्ज्ञांना जेरीस आणलेल्या ७० वर्षीय जुन्या गणितातील एका सूत्राला उलगडण्यात अखेर यश आले. भारतीय गणितीतज्ज्ञ नीना गुप्ता यांनी हे कठीण काम पार केले आहे. गणितातील ‘झरिस्की कॅन्सलेशन कन्जेक्चर’ हे कोड (प्रॉब्लेम) सोडवण्यासाठी जगभरातील गणितीतीतज्ज्ञ मागील ७० वर्षांपासून जिवापाड मेहनत घेत होते. पण नीनाच्या प्रयत्नाला यश आले. आणि त्यांच्या या कार्याला जगभरातून वाहवा मिळाली आहे.
ध्येयाला पूर्ण करण्यासाठी जिद्दीची जोड दिली तर अशक्य ते शक्य होऊ शकते. यांची प्रचिती देणारी ही घटना आहे. गणितातील ‘झरिस्की कॅन्सलेशन कन्जेक्चर’ हे कोड (प्रॉब्लेम) सोडवण्यासाठी जगभरातील गणितीतीतज्ज्ञ मागील ७० वर्षांपासून जिवापाड मेहनत घेत होते पण भारतातील नीना गुप्ता यांनी हा प्रॉब्लेम सोडवून गणितात अभूतपूर्व यश मिळवले आहे.
या कामगिरीसाठी नीना गुप्ता यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. २०१४ साली रामानुजन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर २०१३ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा सरस्वती कौशिक पदक देऊन त्यांचा गौरव आला आहे. आपले हे यश नीना गुप्ता यांनी पी.एचडी करु देणाऱ्या आपल्या आईवडिलांना समर्पित केले आहे.