अयोध्येत राम मंदिरासाठी ७0 ट्रक दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 05:01 IST2018-10-25T05:01:55+5:302018-10-25T05:01:59+5:30
राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुका तोंडावर येताच, विश्व हिंदू परिषदेने मंदिराची जोरदार तयारी अयोध्येत सुरू केली आहे.

अयोध्येत राम मंदिरासाठी ७0 ट्रक दगड
अयोध्या : राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुका तोंडावर येताच, विश्व हिंदू परिषदेने मंदिराची जोरदार तयारी अयोध्येत सुरू केली आहे. मंदिर-मशिदीच्या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अयोध्येत ७0 ट्रक भरून दगड मागविण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असे रा.स्व. संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेला वाटत आहे. त्यामुळेच राम मंदिराच्या बांधकामाची तयारी अयोध्येत सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी २९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. अयोध्येत कारसेवकपुरममध्ये येणारे भाविक व पर्यटकांचे आता जोरदार स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी तिथे नियमित राम भजने गायली जातात आणि स्थानिक पुजारीही सक्रिय झाले आहेत.