७० हजार कर्मचाऱ्यांची आज निदर्शने

By Admin | Updated: January 30, 2017 04:18 IST2017-01-30T04:18:41+5:302017-01-30T04:18:57+5:30

जीएसटी परिषदेने अलीकडे घेतलेल्या काही निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी कर विभागाने देशभरातील ७० हजार अधिकारी आणि कर्मचारी काळ्या फिती बांधून निदर्शने करणार आहेत.

70 thousand employees protest today | ७० हजार कर्मचाऱ्यांची आज निदर्शने

७० हजार कर्मचाऱ्यांची आज निदर्शने

नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेने अलीकडे घेतलेल्या काही निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी कर विभागाने देशभरातील ७० हजार अधिकारी आणि कर्मचारी काळ्या फिती बांधून निदर्शने करणार आहेत.
जीएसटी परिषदेने घेतलेले निर्णय राज्यांच्या बाजूने असून, केंद्र सरकारच्या शुल्क लागू करण्याच्या तसेच कर वसुलीच्या सौर्वभौम कार्याच्या दृष्टीने चांगले नाहीत, असे कर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने म्हटले आहे.

Web Title: 70 thousand employees protest today