आईला धडा शिकविण्यासाठी 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: May 25, 2017 13:25 IST2017-05-25T13:25:55+5:302017-05-25T13:25:55+5:30

हरियाणामधील यमुनानगर भागात सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

A 7-year-old girl raped for teaching her mother | आईला धडा शिकविण्यासाठी 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

आईला धडा शिकविण्यासाठी 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 25- हरियाणामधील यमुनानगर भागात सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.  21 वर्षाच्या नराधमाने हा प्रकार केला असून पीडित मुलीच्या आईसोबत झालेल्या भांडणाचा हिशोब चुकविण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं आहे. इतकंच नाही तर आरोपीने क्रुरतेचा कळस गाठला. बलात्कारानंतर आरोपीने  माचिसच्या काड्या, नाणी तसंत धातुसदृश पदार्थाचे तुकडे पीडित मुलीच्या शरिरात टाकले.. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून यमुनानगर पोलिस स्टेशनमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.  
रविवारी म्हणजेच 21 एप्रिल रोजी ही घटना समोर आली आहे. पीडित मुलीची मेडिकल टेस्ट झाली होती यामध्ये आरोपीने पीडितेच्या शरिरात टाकलेल्या माचिसच्या काड्या तसंच धातुसदृश्य पदार्थाचे तुकडे बाहेर काढण्यात आले. यमुनानगर सिव्हील हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विजय दहीया यांनी पीडित मुलीवर उपचार केल्याची माहिती समोर येते आहे.  मुलीची तब्येत जास्त बिघडल्यामुळे तीला चंदिगढच्या पीजीआयएमएसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच माचिसच्या काड्या, पाच रूपयाचं एक नाणं आणि काही कापसाचे बोळे त्या मुलीच्या शरिरातून बाहेर काढण्याच आले आहेत. पुढच्या तपासणीसाठी पोलिसांकडे या गोष्टी देण्यात आल्या आहेत. "आरोपी हा पीडित मुलीचा शेजारी असून मुलीच्या आईसोबत झालेला वाद मिटवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने चौकशी दरम्यान दिली आहे. अशी माहिती पोलीस अधिकारी नरेश शर्मा यांनी दिली आहे.  
पीडित मुलीचे आई-वडील तिकडच्या स्थानिक कारखान्यात काम करतात. ते दोघेही कामानिमित्त बाहेर गेले असताना आरोपीने मुलीला मिठाईच्या देण्याच्या बहाण्याने बोलावलं होतं.  पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार तीच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी महिला पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. 
 

 

Web Title: A 7-year-old girl raped for teaching her mother