दिल्लीत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: December 13, 2015 11:43 IST2015-12-13T11:30:19+5:302015-12-13T11:43:04+5:30

दिल्लीच्या तिगरी भागात शनिवारी सायंकाळी एका सातवर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली.

7-year-old girl raped in Delhi | दिल्लीत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

दिल्लीत ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ -  दिल्लीमध्ये महिला सुरक्षेसाठी विविध उपायोजना करुनही महिला विरोधातील गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. शनिवारी सायंकाळी दिल्लीच्या तिगरी भागात एका सातवर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली असून, दोघेजण अजून फरार आहेत. 

पीडित मुलीला उपचारासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपीचे वय १६ वर्ष असून, त्याला महानगर न्यायदंडाधिका-यांपुढे हजर करण्यात आले. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबाला ओळखत होता. तो सुध्दा त्याच वस्तीमध्ये रहातो. 
 
पीडित मुलगी पहिल्या इयत्तेत असून, शनिवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास तिगरी भागातील तिच्या घराजवळून आरोपींनी तिचे अपहरण केले व निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर बेशुध्दावस्थेत त्या मुलीला घराजवळ टाकून आरोपी पसार झाले. प्रथम शेजा-यांचे लक्ष त्या मुलीवर गेले. त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. आम्ही नैब साराई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली पण पोलिसांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. मागच्या दोन दिवसातील दिल्लीतील बलात्काराची ही दुसरी घटना आहे. 

Web Title: 7-year-old girl raped in Delhi