शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१३ महिन्यांत ७ दौरे, पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये का येताहेत? असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 21:21 IST

Narendra Modi: गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. इथे पंतप्रधान मोदी विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये एका गृहनिर्माण प्रकल्पाचंही उद्घाटन होणार आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी मोदींनी देशातील सर्वात लांब पूल असलेल्या अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं.

महाराष्ट्रामध्ये जून २०२२ मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं होतं.  तेव्हापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी सातवेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार होत असलेले दौरे हे केवळ योगायोग नाही आहे. त्यांची नजर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आहे. उत्तर प्रदेश (८०)नंतर महाराष्ट्रामध्ये (४८) लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारंवार होत असलेल्या दौऱ्यांमधून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा भाजपाचा इरादा आहे. 

भाजपाने पुढच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मागच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने मिळून ४१ जागा जिंकल्या होत्या. आता महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी आघाडी घेणयाचा भाजपाचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा