जम्मू-काश्मीरमध्ये एटीएम कॅशव्हॅनवर दहशतवादी हल्ला, 7 जणांची हत्या
By Admin | Updated: May 1, 2017 21:20 IST2017-05-01T18:01:29+5:302017-05-01T21:20:00+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे

जम्मू-काश्मीरमध्ये एटीएम कॅशव्हॅनवर दहशतवादी हल्ला, 7 जणांची हत्या
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 1 - जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी आता एटीएम कॅशव्हॅनला लक्ष्य केलं आहे. एटीएम कॅशव्हॅनवर हल्ला करत दहशतवाद्यांनी 7 जणांची हत्या केली आहे. हत्या केलेल्यांमध्ये 5 पोलिसांचा समावेश आहे. तसेच दोन गार्डचीही हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी व्हॅनमधील 50 लाखांच्या रोकडसह पोलिसांचा शस्त्रसाठाही लुटला आहे.
पोलिसांकडील 5 एके 47 रायफल दहशतवाद्यांनी पळवल्या. दरम्यान पोलिसांकडून अद्याप रोकड लुटल्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही तासांपूर्वी शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडकडून देण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना यात दोन जवान आज शहीद झाले. या दरम्यानच शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. सोमवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.